...तर मुंबई लोकल सेवा होणार बंद; संसर्ग रोखण्यासाठी सरकार आक्रमक

ज्वेलर्स, कापडांची दुकानं बंद ठेवण्यात मुंबई लोकांनी गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. 'मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे खासगी कंपन्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच कार्यालयात बोलवा असं सांगितलं आहे. सरकारी कार्यालयातही ५० टक्क्यांपेक्षी कमी लोकांनी काम करावं असा निणय घेत आहोत. जेणेकरुन सार्वजनिक वाहतक सेवेवर ताण कमी पडावा. त्या अनुषंगाने महत्तावाचे निणयघेत आहोत. मुंबईच्या लोकांनी ऐकलं नाही तर बस आणि ट्रेन सेवा १० ते १२ दिवसांसाठी जनहितार्थ बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रात ४२ करोनारुग्णआहेत.आतापर्यंत ८०० टेस्ट झाल्या असून त्यापैकी ४२ पॉझिटिव्ह सापडले आहेत. उर्वरित सर्व निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्यांचीच चाचणी केली जात आहे. तसंच राज्यात आणखी काही लॅब, हॉस्पिटल सुरु करणार आहोत'. अत्यावश्यक सेवा बंद करणार नाही आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.