अकोला कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे फिलीपाईन देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर असल्याने या आपदग्रस्त भागात अकोला, बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १७ विद्यार्थी मनिला शहरात अडकले आहेत. मदतीसाठी त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे. फिलीपाईन्समध्ये सुमारे १५० भारतीय विद्यार्थी असून महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांचा 'व्हिसा' मुदत संपल्याने त्यांना नुतनीकरण करुन घ्यावे लागणार आहे. भारताने विदेशी विमानांना प्रतिबंधीत केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. काहींचे तिकीट बुक असूनही परत येणे शक्य झाले नाही. तेथील शाळा, महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुटी असून बाजारपेठ बंद आहेत. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांची विक्रीही बंद ठेवण्यात येत आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त- पान २ वर
फिलिपाइन्समध्ये फडकल काला जिल्ह्यातील विद्यार्थी अडकले अकोला प्रतिनिधी/१८ मार्च