लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल नवी दिल्ली: जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाय केले जात आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक असणाऱ्या इराणने करोनाचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर इराणच्या करोनामळे मरण पावलेल्यांची संख्या ९८८ इतकी आहे. संशोधकांचा इराणमध्ये करोनामुळे भितीचे वातावरण असतानाच इशारा देशातील एका विद्यापिठातील संशोधकांनी करोनाच्या साथीमुळे केवळ इराणमध्येच ३३ लाख लोकं मरण पावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील काही महिन्यांमध्ये अमेरिकेबरोबर सुरु असणाऱ्या वादामुळे अनेक आर्थिक निबंध लादण्यात आलेल्या इराणमध्ये करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
..तर देशामध्ये ३३ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल